गुंड गणेश कदम आणि साथीदारांचा बंदोबस्त करा : गुहागर तहसीलदार यांना निवेदन

0
23

गुहागर : गुंड गणेश कदम आणि साथीदारांचा बंदोबस्त करा, जीवघेणा हल्ल्याचे गुन्हे दाखल करा. सर्व आरोपींना शोधून अटक करा, गणेश कदम याला कोकणातील हद्दीतून कायमचा तडीपार करा, अशा विविध मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना मंगळवारी गुहागर तालुका कुणबी समाजाच्यावतीने तालुक्यातील नेतृत्व रामचंद्र हुमणे, कृष्णा वणे, राजेश बेंडल आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थित देण्यात आले.
दि. 18 जानेवारी 2023 रोजी बेकायदेशीर संघात घुसून आपल्या साथीदारासह कुणबी समाजाची अस्मिता, मातृसंस्थाच्या परेल येथील कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता. आक्षेर्पाह पोस्टची खातरजमा न करता काही माथेफिरुंकडून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या मातृसंस्थेत घूसून युवा पदाधिकाऱ्यांवर भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. अशा या विकृत माथेफिरुंचा बंदोबस्त करण्यासाठी गुहागर तहसीलदार व गुहागर पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुका ग्रामिण शाखा, गुहागर-पालशेत-हेदवी-तवसाळ गट, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भ्यास हल्ल्याचा समस्त ओबीसी व कुणबी समाज जाहीर निषेध करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here