विघ्रवली येथील वृद्धाश्रमाचे 22 रोजी लोकार्पण
देवरुख : नजीकच्या विघ्रवली माळवाडी या ठिकाणी पालकर दांपत्याने सामाजिक बांधिलकीतून अठरा खोल्यांचे सुसज्ज वृद्धाश्रम बांधले आहे. याचे उद्घाटन दि. 22 रोजी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते व आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वा. होणार आहे. वृद्धापकाळ देखील आनंददायी व्हावा या संकल्पनेतून उद्योजक विजय पाटकर व भारती पाटकर यांनी वृद्धाश्रम उभारले आहे. वाचनालय, मनोरंजन, योगाभ्यास, लिप्ट अशा सोयी सुविधेने परिपूर्ण असलेल्या इमारतीचे
काम पूर्ण झाले आहे. वयोवृद्धांची राहण्याची उत्तम सोय शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार, प्रशिक्षित काळजीवाहू कर्मचारी वर्गासह आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका सेवेसह निसर्गाच्या सानिध्यात 18
खोल्यांचे प्रशस्त संकुल सज्ज केले आहे.