रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवणार
रत्नागिरी : रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ जयंत चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दि. 11 जानेवारी ते दि. 17 जानेवारी हा सप्ताह रस्ता सुरक्षा अभियान म्हणून राबविण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाकडून आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून जनजागृती रॅली, शालेय मुलांचे वॉकेथॉन रॅली, एसटी विभागात एसटी चालक वाहकांसाठी मार्गदर्शन, महामार्गावरही वाहनधारकांना वाहनाचा वेग मर्यादेविषयी जनजागृती करण्यात आली. गेल्या आठवड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन आरटीओ कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सर्व आरटीओ कर्मचारी, अधिकार्यांनी रक्तदान केले.