कोकण पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ दापोलीत १८ जून रोजी सभा

कोकण पदवीधर मतदार संघाकरिता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एकमताने रमेश कीर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ दि. १८ जून रोजी सायं. ६ वाजता पेन्शनर्स सभागृह दापोली येथे महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासह दापोलीचे माजी आमदार संजयराव कदम व आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व आघाडीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) अध्यक्ष सचिन तोडणकर, शिवसेना उबाठाचे अध्यक्ष ऋषिकेश गुजर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष भाऊ मोहिते यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button