केळ्ये येथे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील केळ्ये बांध स्मशानभूमीजवळ बेकायदेशिरपणे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5.45 वा. सुमारास करण्यात आली. अमित अनंत वाडकर (वय 37, रा. केळ्ये म्हामुरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेड काँस्टेबल उमेश गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केळ्ये येथे धाड टाकली असता त्यांना अमित वाडकरकडे गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.