
*हिसार-कोइमतूरला एक अतिरिक्त वातानुकुलीत डबा*
___कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेसपाठोपाठ हिसार-कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेसलाही तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त वातानुकुलीत डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने बुधवारी जाहीर केले.त्यानुसार २२७४५/२२४७६ क्रमांकाची हिसार-कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेस ७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दर बुधवारी तर परतीला १० फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान दर शनिवारी एक अतिरिक्त वातानुकुलीत डब्यांची धावणार आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. साप्ताहिक एक्सप्रेसला एक अतिरिक्त वातानुकुलीत डबा जोडण्यात आल्यामुळे पर्यटक सुखावले आहेत. www.konkantoday.com