राज्यातील विविध शाळांनी एसटीलाच दिली पहिली पसंती ,
सात दिवसांच्या कालावधीत राज्यात तब्बल पाच हजार ६३७ एसटी सहलीसाठी बुक
शालेय सहलींचा प्रवास किफायतशी दरात आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्यातील विविध शाळांनी एसटीलाच पहिली पसंती दिली आहे. २८ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या सात दिवसांच्या कालावधीत राज्यात तब्बल पाच हजार ६३७ एसटी सहलीसाठी बुक झाल्या.कोरोनामुळे गेली दोन वर्ष शालेय विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात आल्या नव्हत्या. मात्र कोरोनाचे संक्रमण घटल्याने निर्बंधामध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मार्च २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु झाल्या. त्यामुळे यंदा शाळांनी सहली काढल्या. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरक्त इतर परिसराचीही माहिती मिळावी या हेतूने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. तर अनेक शाळा विविध पर्यटन स्थळी जाण्यास पसंती देतात.
सहलीचा प्रवास हा सुरक्षित व्हावा यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी यंदा एसटी बसलाच पसंती दिली आहे. एसटी शाळा – महाविद्यालयांना सहलीसाठी वर्षभर नैमित्तिक करारावर बस पुरविते. त्यापैकी साध्या बसवर ५० टक्के सवलत दिली जाते. उर्वरित प्रतिपुर्ती रक्कम राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभागाकडून महामंडळाला दिली जाते.
www.konkantoday.com