रत्नागिरीविमानतळाचे काम लवकरच सुरू होणार, प्रस्तावित भूसंपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी शासनाकडून प्राप्त
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील प्रस्तावित भूसंपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता ३१ जानेवारीपर्यंत संपूर्ण भूसंपादन करून विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे घेण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात यापैकी ४ जणांना प्राथमिक स्वरूपात निधीचे वाटप करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील विमानतळ हा बरेच वर्षे रत्नागिरीकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. इथल्या विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न, धावपट्टी, नाईट लँडींग, योग्य पार्किंग अशा बर्याच प्राथमिक प्रश्नांमुळे रत्नागिरीतील विमानतळ असूनही नसल्यातच जमा होते. हे विमानतळ लवकरात लवकर सर्व सोयीसुविधांनी सज्ज व्हावे यासाठी प्रशासनाकडे तगादा सुरू होता. अत्याधुनिक विमानतळासाठी असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेचे भूसंपादन करणे गरजेचे होते. यासाठी मिरजोळेसोबतच तिवंडेवाडी येथील जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे. प्रशासनाकडून विमानतळासाठी आत २७.९९ हेक्टर एवढी जागा संपादित करण्यात येत आहे.
www.konkantoday.com