कुटरे येथे विहिरीत पडलेल्या सांबराची वनविभागाने केली सुटका
चिपळूण : तालुक्यातील कुटरे बादेकोंड येथे पडक्या विहिरीमध्ये पडलेल्या सांबराची वन विभागाच्या अधिकार्यांनी सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. दीपक शिर्के यांच्या घराच्या शेजारील विहिरीमध्ये सांबर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दूरध्वनीव्दारे ही माहिती वन विभागाला दिली. घटनास्थळी पोहोचून सावर्डेचे वनपाल उमेश आखाडे, नांदगावचे वनरक्षक श्री. गुंठे यांनीत्या सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तत्काळ माहिती देण्याकरिता वनविभागाचा टोल फ्री क्र. 1926 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.