पावनळ येथे खून करणार्‍या मित्राला पोलिस कोठडी

0
62

दापोली :  पावनळ येथे सुशांत परब या तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवार दि. 2 जानेवारी रोजी दुपारी 11.30 वाजण्याच्या उघडकीस आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेला सुशांत याचा  मित्र जयकीसन ओमप्रकाश सिंग  याला न्यायालयापुढे उभे केले असता दि. 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. या घटनेत सुशांत परब यांचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता. दापोली पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सुशांत याचा खून त्याच्याच मुंबईतील मित्राने केला असल्याचे उघड केले . मात्र हा खून का करण्यात आला याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here