शीळ येथून कातभट्टीवरील कामगार बेपत्ता
राजापूर : तालुक्यातील शीळ गावातील कातभट्टीवर कामानिमित्त आलेला एक उत्तर प्रदेशातील कामगार बेपत्ता असून त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नन्हु हरिव्दार निषाद (वय 34) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. याबाबत मुदस्सर कमरुद्दीन पन्हळेकर (रा. मापारी मोहल्ला, राजापूर) यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दिली. काहीजणांसोबत तो दि. 29 डिसेंबरला शीळ येथील कातभट्टीवर कामासाठी आला होता. रात्रीचे जेवण झाल्यावर रात्री साडेअकराच्या दरम्यान तो तेथून बाहेर पडला. त्याचा अद्याप शोध लागला नाही. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.,