नववर्षारंभी रत्नागिरीत बहुतांश ग्रामीण बसफेऱ्या सुटल्याच नाहीत; सुस्थितीत असलेली बस उपलब्ध होत नसल्याने चालक-वाहक नाराज
रत्नागिरी : रविवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहक व चालकांनी गाड्या डेपोतून बाहेर न काढण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश ग्रामीण फेर्या बंद राहिल्या. डेपोतून त्यांना गाडी सुस्थितीत उपलब्ध होत नाही, असे चालक व वाहकांचे म्हणणे आहे. एसटी वाहतूक निरीक्षकांकडून तपासणी केली जात आहे. याबाबत गाडीच्या स्थितीबाबत चालक वाहकांकडून लिहून घेतले जात आहे. त्यामुळे याचा मन:स्ताप वाहक व चालकांना होतो. त्यामुळे रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून अनेक फेर्या सुटल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय झाली.