
रत्नागिरीजिल्ह्यात ७८० हेक्टर गायरान सुरक्षित, अतिक्रमण नाही
राज्यातील गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे राज्यभरात अतिक्रमण करणार्यांची धावाधाव सुरू आहे. काही ठिकाणी या निर्णयाविरूद्ध मोर्चे निघाले, आरोपांचे रान उठले, मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला काहीसा अपवाद आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनीची वस्तूस्थिती महसूल विभागाने तपासून पाहिली. तेव्हा एकूण ७८० हेक्टर गायरान जागा पूर्णपणे सुरक्षित आहे. या जमिनी कोणी लाटलेली नाहीत तर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले नसल्याचे समजते.
www.konkantoday.com