खासदार राऊत यांच्या पाठपुराव्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 166 कोटी; सर्वाधिक कामे राजापुरात
रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रखडलेली रस्त्यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 166.17 कि.मी. रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी 128 कोटी 55 लाखांचा निधीची ही कामे आहेत.
केंद्र शासनाकडे ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडकची कामे गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित होती. त्यासाठी खासदारांमार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मात्र त्याकडे केंद्र शासनाकडून दुर्लक्ष होत होते. त्यामुळे विनायक राऊत यांनी 15 डिसेंबर 2022मध्ये खा. सुनील तटकरे व बाळू धानोरकर यांच्यासह केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन कामांना मंजुरी मिळावी म्हणून विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व खासदारांना घेऊन 21 डिसेंबर रोजी पुन्हा भेट घेण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री व सचिव स्तरावर बैठक झाली. त्यामध्ये खासदारांनी आक्रमक भुमिका घेतल्याने खासदारांनी सुचविलेल्या कामांना मंजुरी देण्यात आली. खा. राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यातील 26 कामांसाठी सुमारे 128 कोटी 55 लाख 43 हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील आकले-कादवड-कोंडवले धनगरवाडी रस्ता, शिरगाव बाजारपेठ ते निगडवाडी धनगरवाडी रस्ता, सती अडरे अनारी ते कुडप देवशेतवाडी रस्ता, लांजा तालुक्यातील देवधे आसगे बेनी रस्ता, वाकेड बोरथडे वनगुळे धनगरवाडी रस्ता, कुवे पन्हाळे पडवण, वेरवली खु. व वेरवली बु. रस्ता, राजापूर तालुक्यातील तळवडे बौध्दवाडी ते इंजिनवाडी रस्ता, हायवे ओणी तोरणवाडी बौध्दवाडी ते चिखलगाव बौध्दवाडी रस्ता, गोठणे चिखलगाव ते ओणी दैतवाडी रस्ता, नाटे ते आंबोळगड रस्ता, ताम्हाणे मोरोशी ते केळवली रस्ता, कळसवली चुनाकोळवण निवखोलवाडी रस्ता, एसएच150 ते वडवली ते वडदहसोळ रस्ता, चव्हाणवाडी ते अणसुरेबांध रस्ता, रत्नागिरी तालुक्यातील पाली ग्रामपंचायत ते धनगरवाडी अष्टाचाकोंड वेळवंड रस्ता, गोळप धर्मशाळा दाभिळवाडी गोळप मस्जीद रस्ता, ओरी मटकरवाडी ते सोमेश्वर अॅप्रोच रोड, जाकादेवी खालगाव राई रस्ता, हातखंबा झरेवाडी उंबरे रस्ता, चाफेरी कासारी सांडेलावगण रस्ता, संगमेश्वर तालुक्यातील तुरळ माखजन आंबव आरवली रस्ता, एमडीआर 48 ते परचुरी फुणगुस रस्ता, शास्त्री ब्रीज आंबेड खु. कुंभारखाणी खु. धामापूर ते ओडीआर 64 रस्ता, धामापूर मावळंगे मांडवकरवाडी आंबेड माखजन रस्ता, पाटगाव पूर, कुडवली मठधामापूर सप्रेवाडी मराठी शाळा रस्ते मंजूर झाले आहेत. सर्वाधिक रस्ते राजापूर तालुक्यात आहेत.