सावर्डेत आ. शेखर निकम यांचे जल्लोषात स्वागत; पाणी योजनेला सुमारे 17 कोटी मंजूर झाल्याचा उत्साह
सावर्डे : जल जीवन मिशन अंतर्गत सावर्डे, सावर्डे खुर्द, सावर्डे कासारवाडी पाणी योजनेला 16 कोटी 96 लक्ष 6 हजार 879 मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे नागपूर अधिवेशनानंतर आ. शेखर निकम सावर्डेत दाखल होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नागपूर अधिवेशनवरून आ. निकम सावर्डे येथे आले असता सावर्डे ग्रामपंचायत, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आणि सर्व ग्रामस्थांचा वतीने सावर्डे मध्ये स्वागत करुन सत्कार करण्यात आला. सावर्डे गावचे सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी यांचा हस्ते शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जल जीवन मिशनचे कुलकर्णी यांचेही स्वागत करण्यात आले, ही योजना मंजुरीला मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले. या योजेनेमुळे सावर्डे गावचा पाण्याचा प्रश्न
पूर्णपणे मिटणार आहे, असे आ. निकम यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती पूजा निकम, विजय गुजर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबू चव्हाण, ग्रा. पं, सदस्य बाळू मोहिरे, अजित कोकाटे, शरद चव्हाण, ग्राम विकास अधिकारी के. डी. पवार, विष्णू पंत सावर्डेकर, वि. का. सोसायटी अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, शौकत माखजनकर आदी उपस्थित होते