सागरी महामार्ग रखडला, कोकणच्या पर्यटनावर विपरीत परिणाम
मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्गही रखडल्याने कोकणचा मुख्य आधार बनू पाहत असलेला पर्यटन उद्योग अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. दापोली-मंडणगडमधील बाणकोट, केळशी खाडी पूल पूर्णत्वाच्या, तर दाभोळ खाडीवरील पूल मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने दापोलीतील पर्यटन उद्योगाने अद्याप टॉप गिअर टाकलेला नाही. हा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असतला येथील पर्यटन उद्योगाचे चित्र अधिक सुखावह दिसले असते.
सध्या दापोली तालुका पर्यटन उद्योग बहरला. पूर्वी गोव्याला जाणारे पर्यटक दापोली तालुक्यातील समुद्रकिनार्यांना अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाने कात टाकली असून पूर्वी मर्यादित गावांमध्ये होणारी न्याहारी निवास व रिसॉर्टची व्यवस्था आता अनेक किनार्यांवर विस्तारली आहे. पर्यटकांच्या वाढत्या आलेखामुळे काही वर्षातच येथे स्थानिक आणि परजिल्ह्यातील भांडवलदारांनीही मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत. मात्र सुविधा नसल्याने यावर मोठा परिणाम होत आहे www.konkantoday.com