गेट वे ऑफ इंडिया ते गोवा व पुन्हा गोवा ते वसई असा जलतरणातील जागतिक विक्रमाची नोंद
वसई तालुक्यासह इतरत्र भागांतील सहा जलतरणपटूंनी गेट वे ऑफ इंडिया ते गोवा व पुन्हा गोवा ते वसई असा जलतरणातील जागतिक विक्रमाची नोंद गुरूवारी दु. १.४५ वा. वसईच्या समुद्रकिनारी नोंदवली आहे. या सहा जलतरणपटूचे स्वागत नालासोपाराचे आमदार तथा खेलो इंडिया खेलोचे महाराष्ट्र अध्यक्ष क्षितिज ठाकूर यांनी केले.
यावेळी बविआचे माजी महापौर नारायण मानकर, कला क्रीडा महोत्सवाचे प्रकाश वनमाळी, वसई तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राजाराम बाबर, नवघर माणिकपूर शहप्रमुख संजय गुरव, शशिभूषण शर्मा, वसई पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, सचिव आशिष राणे, आदींनी उपस्थित राहून स्वागत केले. या मोहिमेत जलतरणपटू हे मुंबई, ठाणे, पुणे, वसईतील असून यामध्ये कार्तिक गुगले (२०), राकेश रविंद्र कदम (२४), संपन रमेश शेलार (२१), जिया राय (१४), दुर्वेन विजय नाईक (१७), राज संतोष पाटील (१७), यांचा समावेश आहे. या सहा जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) ते डोना पॉला (गोवा) आणि परत वसई किल्ल्यापर्यंत रिले पद्धतीने पोहून एकूण ११०५ किमी आणि ४५० मी अंतर ११ दिवस २२ तास आणि १३ मिनिटे ४ सेकंदानी पूर्ण करत आतापर्यंत विश्वातला कॅलिफोर्निया येथील २०१९ मध्ये ९५९ किमीच्या समृद्ध अंतराचा विक्रम मोडीत काढला आहे.
www.konkantoday.com