सिद्धी पानगलेची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी पानगले हिची राज्य महिला कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर या ठिकाणी 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत होत आहे. महाराष्ट्र राज्य महिला कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. या संघात चमकदार कामगिरी करणार्‍या बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयातील सिद्धी पानगले हिची जिल्हा संघात निवड झाली आहे. सिद्धी ही इयत्ता 11 वी कला शाखेत शिक्षण घेत आहे. सिद्धी हिला सहायक शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सुरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button