
थर्टी फर्स्टच्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर; मद्याच्या दुकानांना रात्री 1 पर्यंत परवानगी
रत्नागिरी : वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात बार व मद्यविक्रीची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र रात्रीच्यावेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मद्यप्राशन करून वाहने चालवणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. पर्यटनस्थळे व रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्यांवरही कारवाई केली जाणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. ही बाब विचारात घे ऊन पोलिसांचा वॉच यावर असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्ह्यात दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. गणपतीपुळे येथून रत्नागिरी व पावसकडे येणार्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. समुद्रकिनार्यावरती धोकादायक ठिकाणी पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार असून ग्रामीण भागात पोलिस पाटील आणि ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे. येणार्या पर्यटक महिलांच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.




