
अश्लील चित्रफित बनवून अल्पवयीन मुलीवर दीड वर्षे अत्याचार ,आरोपी ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून घेऊन तिच्याशी दीड वर्षे अत्याचार करून तिची अश्लील चित्रफीत बनविल्याच्या आरोपावरून वसीम खलपे व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .यातील वसीम याला ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
यातील वसीम व त्याच्या साथीदाराने या महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळख वाढवली त्यानंतर सदर मुलीला गाडीत कोंबून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्याची अश्लील चित्रफीत बनवली त्यानंतर सदर तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर जानेवारी १७ते ऑगस्ट १८या कालावधीत अत्याचार केला. यातील तिसऱ्या आरोपीने या मुलीला वारंवार फोनवरून अश्लील संभाषण करून फोनवरून धमक्या दिल्या. याप्रकरणी मुलीने व तिच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस स्थानकात उशिरा तक्रार दाखल केली .या प्रकरणी पोलिसांनी वसीम याला ताब्यात घेतले न्यायालयात हजर केले त्याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
www.konkantoday.com




