चांदोर येथे गोठ्याचा दरवाजा फोडून शेळ्या, बोकड चोरले

रत्नागिरी : शेळ्या आणि बोकड चोरीला गेल्याची घटना चांदोर-तळीवाडी येथे घडली. गोठ्याचा दरवाजा फोडून अज्ञाताने 38 हजार रुपयांचे पशुधन चोरून नेले. ही घटना 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वा. कालावधीत घडली आहे. याबाबत सखाराम भन्या कोकरे (70, रा चांदोर फाटा, रत्नागिरी ) यांनी मंगळवारी पूर्णगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या गोठ्यात गायी, 35 लहान-मोठ्या शेळ्या, बोकड होते. 7 डिसेंबर रोजी सकाळी त्यांना गोठ्याचा दरवाजा फोडलेला दिसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button