फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गोळप येथे शेतकरी दिन साजरा

0
90

शेतकरी दिन हा एक दिवस नव्हे तर कायमस्वरूपी केला पाहिजे. कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे बंद झाले. पण शेती व्यवसाय चालू राहिला, शेतकरी म्हणजे भारताची शान आहे. सध्या रत्नागिरीत घाटमाथ्यावरून पालेभाज्या येतात. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. अजय शेंडे यांनी केले.राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त गोळप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन, रत्नागिरी कृषी विभाग व गोळप ग्रामपंचायतच्या वतीने सेंद्रीय शेतीचे महत्त्व व कीटकनाशकांचा योग्य वापर या विषयावर कार्यशाळा झाली. या वेळी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गावातील १७० महिला, पुरुष शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे बियाणे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृषी विकास अधिकारी श्री. अजय शेंडे यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि त्याच्या अनुदानासंबंधी सविस्तर माहिती दिली.

भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यपक डॉ.सुनील घवाले म्हणाले की, सेंद्रीय भाजीपाला असेल तर आपली रोग प्रतिकारशक्ती वाढणार आहे. त्यामुळे परसदारी आणि व्यावसायिक दृष्टीनेही शेतकऱ्यांनी पालेभाज्यांसह भेंडी, वाल, गवार, घेवडा, पालक आदी भाजीपाला पिकवा. बटाटा किंवा कडधान्यातून प्रोटीन मिळते पण पालेभाजीतून जीवनसत्व मिळतात. स्वतः पिकवलेल्या भाजीपाल्याने वेगळे समाधान मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती करून उत्पन्न वाढवा.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी श्री. अजय शेंडे यांनी केले, डॉ.सुनील घवाले, सदस्य संदीप तोडणकर, अविनाश काळे, फैजान मसुरमुल्ला, रुपाली राड्ये, समीक्षा शेडगे, वृषाली पालकर यांच्यासह फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अधिकारी उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी माधव बापट यांनी मोलाचे सहकार्य लाभले. मुळा, गवार, भेंडी, पालक, पालेभाज्यांसह भाजीपाल्याचे बियाणे दिल्यामुळे या स्तुत्य उपक्रमाबद्दल गोळप ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी आभार मानले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना स्नेहभोजनही देण्यात आले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सिनियर जरनल मॅनेजर तानाजी काकडे यांनी सांगितले, गेली ३० वर्षे फिनोलेक्स कंपनी गोळपसह अन्य बाजूच्या गावातील शेतकरी वर्गासाठी सुद्धा मदत करत आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी गोळप ग्रामपंचायतीने दिली आहे. आज बियाणे दिले असले तरी पुढे भाजीपाल्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य देण्याची आमची भूमिका दाखवली. कंपनीच्या संचालिका रितु प्रकाश छाब्रिया यांनीही शेतकऱ्यांसाठी शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here