
कोकण रेल्वे मार्गावर इरोड-बारमेर साप्ताहिक धावणार १३ जूनपर्यंत
उन्हाळी सुट्टी हंगामासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने कोकण मार्गावर चालवण्यात येणारी इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल १३ जूनपर्यंत चालवण्यात येणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत. २२ डब्यांची स्पेशल वसईमार्गे धावत असून फेर्यांना उदंड प्रतिसादही लाभत आहे. दर मंगळवारी धावणारी इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल इरोड येथून सकाळी ६.२० वाजता सुटून तिसर्या दिवशी पहाटे ४.३० वाजता बारमेर येथे पोहोचते. परतीच्या प्रवासात दर शुक्रवारी धावणारी स्पेशल बारमेर येथून रात्री १०.५० वाजता सुटून तिसर्या दिवशी रात्री ८.१५ वाजता इरोड येथे पोहोचते.
कोकण मार्गावर मडगाव, करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, ’चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आदी स्थानकात थांबे आहेत. उधना-मंगळूरला २ तासांचा ’लेटमार्क’ कोकण मार्गावरून धावणार्या उधना-मंगळूर स्पेशलला सोमवारी २ तासांचा ’लेटमार्क’ मिळाला. एलटीटी-मडगाव – उन्हाळी स्पेशल १ तास ३० मिनिटे तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. याव्यतिरिक्त उर्वरित सर्व गाड्या नियोजित वेळेतच रवाना झाल्या.www.konkantoday.com