
ओसाका वर्ल्ड एक्स्पो – 2025 येथे भारत पॅव्हेलियनला जपानच्या Mie प्रीफेक्चरचे गव्हर्नर मा. कात्सुयुकी इचिमी यांनी भेट दिली.
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि भारत-जपान भागीदारी बाबत संवाद साधला.

महाराष्ट्र हा भारताचा आर्थिक पॉवरहाऊस असून, देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक ही शहरे जागतिक गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीचे केंद्र आहेत.

महाराष्ट्रात ३०० हून अधिक जपानी कंपन्या कार्यरत असून, पुणे हे एक महत्त्वाचे इंडो-जपानी औद्योगिक कॉरिडॉर म्हणून उदयास आले आहे. सुपा-पारनेर जपानी इंडस्ट्रियल पार्क हे जपानी उद्योगांसाठी समर्पित असे विशेष केंद्र उभारण्यात आले आहे.

भारत-जपानचे नाते हे केवळ अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नसून, संस्कृती, परंपरा, विश्वास आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारे आहे. दोन राष्ट्रे आणि एकच दृष्टी – अशा सेतूबंधातून भारत-जपान भागीदारी आणखी मजबूत होईल, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.






