आशा सेविकांची रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
रत्नागिरी : महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या (आयटक) वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अनिरुद्ध आठवले यांना देण्यात आले.त्यांनी वरील मागण्यांच्या संदर्भामध्ये तातडीने संघटनेस लेखी पत्र पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकर पुजारी, पल्लवी पारकर , विद्या भालेकर, विजया शिंदे, अश्विनी माने, मनिषा बनकर, मनाली कदम, अश्विनी शेलार , सोनाली बाईत, तन्वी गुरव, निकिता पवार, विनया पवार, मनिषा भिंगारे इत्यादींनी केले.
महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व त्यांचे वेतन मिळावे. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळावे. आशा महिलांच्या कडून फुकट काम करून घेणे ताबडतोब बंद करावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी करण्याचे केंद्र सरकारने निर्णय करावा, आ.भा. कार्ड वाटप, आयुष्यमान भारत योजना इत्यादीची कामे आशा महिला यांच्याकडून सक्तीने करून घेऊन येते.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळेस आश्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतलेले आहे. पण त्याची रक्कम अद्याप दिलेली नाही. माझे कुटुंब माझी रत्नागिरी मोहीम राबविण्यात आली. पण त्याचे एक हजार रुपये मोबदला फक्त सध्या चिपळूण जिल्ह्यामध्ये दिलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अद्याप या मोहिमेचा लाभ मिळालेला नाही.ती एक हजार रुपये रक्कम अशा महिलांना त्वरित मिळावी. आरोग्यवर्धिनीचे काम ज्या ठिकाणी सिओचो नाहीत त्या ठिकाणी सुद्धा एक हजार रुपये मिळावेत. इत्यादी मागण्यात करण्यात आल्या.