बाळासाहेब ठाकरे तारांगणातून अवकाश दर्शनाचे शो मंगळवारपासून सुरू
रत्नागिरी : माळनाका येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणातून अवकाश दर्शन शो मंगळवारपासून सुरू झाले. रोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत 5 शोचे नियोजन करण्यात आले होते. सध्या रत्नागिरी नगर परिषदेकडूनच हे सर्व नियोजन करण्यात आले असून यथावकाश स्वतंत्र एजन्सी नेमून तारांगणाचे सर्व नियोजन दिले जाणार आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी दिवसभर रिक्षावरील ध्वनीक्षेपकावरून तारांगणातील शो सुरू झाल्याबाबतची माहिती देण्यात येत होती.
बुधवारपासून नियमित 5 शो केले जाणार असून तिकीट दरात काहीसा बदल करण्यात आला आहे. टूडी शोसाठी शालेय विद्यार्थ्यांना 50 रुपये आणि प्रौढांसाठी 100 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर थ्रीडी शोसाठी हेच दर अनुक्रमे 100 व 150 रुपये करण्यात आले असल्याचेही रत्नागिरी नगर परिषदेकडून सांगण्यात आले. सा’साठी निवड झालेल्या मंडणगडातील 10 तरुणांनी रत्नागिरीतील तारांगणात थ्रीडी शो-चा अनुभव घेतला. मंगळवारी या शोला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ सायंकाळी 4 ते 5 च्या शोला एकूण 35 प्रेक्षकांनी अवकाश दर्शनाचा आस्वाद घेतला. त्यामध्ये अमेरिकी अंतराळ संशोध संस्था नासासाठी निवड झालेल्या 10 तरुणांचा सहभाग होता, असे रत्नागिरी नगर परिषदेकडून सांगण्यात आले.