
“वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त लोगो स्पर्धाक्यूआर कोड अथवा लिंक वरुन सहभागी व्हा..
रत्नागिरी, दि. 4 : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतचा क्यूआर कोड अथवा लिंक ला भेट देवून आपण स्पर्धेत सहभागी होवू शकता. प्रतिसाद पाठविण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2025 आहे. क्यूआर कोड अथवा लिंक ला भेट देवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन र. वि. कोकरे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांनी केले आहे.




