
मंडणगडमध्ये 60 टक्के मतदान
मंडणगड : तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तालुक्यात सुरु आहे. त्यानुसार दि. 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया झाली. दुपारी 3.30 वाजपर्यंत तालुक्यात एकूण 60 टक्के इतके मतदान झाले. यात 4965 स्त्री व 4599 पुरुष अशा 9561 मतदारांनी मतदारानाचा हक्क बजाविला. मतदानाची सरासरी 60 टक्के इतकी झाली आहे.
स्थानिक यंत्रणेने चोख व्यवस्था राबवली होती. महाविकास आघाडी विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना अशी रंगत तालुक्यात होत असून शेवटच्या सत्रात मतदानाची सरासरी वाढण्याची शक्यता अधिक आहे. विद्यमान आमदारांनी यात लक्ष घातले आहे. चाकरमानी मतदानासाठी गावी येण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प दिसून आले आहे.