
लांजा-कोर्ले रस्त्यावर एस.टी. बस दुचाकी अपघातात एक जखमी
लांजा ः मोटरसायकल व एस.टी. यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराच्या हाताला आणि पायाला दुखापती झाल्याची घटना लांजा कोर्ले रोडवर घडली आहे.
देवरूख आगाराचे चालक गणेश शामराव वायदंडे हे आपल्या ताब्यातील एस.टी. घेवून लांजा ते साखरपा व्हाया देवडे अशी फेरी लांजा बसस्थानकातून करीत होते. कोर्ले रोडवर साळवी इंजिनिअरींग येथे आले असता समोरून येणारा टेम्पो अंतर्गत रस्त्यावर वळला व एस.टी. चालकाने गाडी बाहेर काढली असता टेम्पोच्या मागे गवाणे येथून सुरेश भानू मोहिते आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेवून घरी गवाणे येथे जात असताना धडक झाली. मोटरसायकल स्वार सुरेश मोहिते यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे.