गोव्यात मिळतोय प्रसिद्ध ओल्ड मंक रमचा चहा
तुम्ही तंदूर, मलई आणि मसाला चहा बद्दल ऐकले असेल. त्याचसोबत ग्रीन टी किंवा ब्लॅक टीही तूम्हाला आवडत असेल. चहाचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. भारतात बनवला जाणारा चहा तर आता परदेशातील लोकांचेही व्यसन बनले आहे.असे असताना तूम्ही कधी दारू पासून बनलेला चहा पाहिला आहे का. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. गोव्यात प्रसिद्ध ओल्ड मंक रमचा चहा बनवला जात असून त्याला ओल्ड मंक टी विथ कुल्हड असे म्हणतात. ओल्ड मंक चहा खास गोव्याच्या बीचवर बनवला जातो. आणि लोकांमध्ये तो खूप प्रसिद्ध होत आहे.
गोव्यातील कँडोलिम येथील सिंक्वेरिम बीचवर तुम्ही ओल्ड मंक रम चहा पिऊ शकता. कुल्हडमध्ये चहा बनवण्यासाठी आधी ते गरम करून त्यात ओल्ड मोंक रम टाकली जाते. मग त्यात चहा घातला जातो. हा चहा कसा तयार होतो याचा एक एक व्हिडिओही आहे.
गोव्यात दारू स्वस्त मिळते त्यामूळे खास दारू पिण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात जातात. अशा या लोकांसाठी हा चहा म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. ओल्ड मंक रम ही 1954 मधील इंडीयन डार्क रम आहे. ती 7 वर्षे जूनी असून तीला एक वेगळी व्हॅनिला चव आहे. त्यात अल्कोहोलचे प्रमाण 42.8 टक्के आहे. याचे उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे केले जाते.
www.konkantoday.com