सौम्या मुकादमचे सलग दुसरे दणकेबाज यश
रत्नागिरी/ प्रतिनिधी:
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत जिजीपीएसच्या सौम्या देवदत्त मुकादम हिने सतरा वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत दिमाखदार यश मिळवून शाळेच्या मुकुटात मानाचा तुरा खोवणाऱ्या सौम्या मुकादम हिने या स्पर्धेतही यश मिळवण्यात सातत्य राखून विभागीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. जिजीपीएस इंग्लिश मिडीयम स्कुलची ऋतुजा नितीन जोशी हिने देखील तिसरा क्रमांक पटकावत यशाची कमान उंचावली आहे.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणेतर्फे झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत अनिवार्य आसनांचा कालावधी अडीज मिनिटे लांबवून त्यांची काठिण्य पातळी कायम राखण्यात आली होती. सौम्या आणि ऋतुजा यांनी सतरा वर्षाखालील गटातून या स्पर्धेत सहभागी होत ही स्पर्धा लीलया पार पाडली. सलग तीन दिवसांत मिळवलेल्या दुसऱ्या यशामुळे सौम्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये जिजीपीएस गुरुकुलचे प्रमुख श्री. किरण जोशी आणि योगशिक्षिका श्रद्धा जोशी यांचा वाटा मोलाचा आहे.