शिरगाव, परटवणे ते शिरगाव पूल रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम आज खान नामक ठेकेदाराने सुरू केले डाम्बर न वापरता जाडी खडी पसरवून त्यावर थोडे डाम्बर शिपडण्यास सुरवात केल्यावर ग्रामस्थांनी हे काम बंद केले, या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी देखरेखीसाठी उपस्थित नव्हता.
या रस्त्याबाबत 8 ते 10 दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे व रस्त्याला गटार असावे यासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व मा. जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते व *काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यास ते बंद करण्यात येईल याची जाणीव करून देवुनसुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करून ठेकेदारासाठी काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
गेल्यावर्षी याच रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते ते निकृष्ठ झाल्याचे सार्वजनिक बांधकामखात्याच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले होते.
म्हणजे एकाच कामावर दरवर्षी खर्च करून जनतेच्या पैशाचा चुराडा करून ठेकेदाराचे पोट भरण्याचे काम संबंधित खाते करत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
वास्तविक गणपतीपुळे ,जयगड ला जाणारी वाहतूक याच रस्त्यावरून होत असताना, सार्वजनिक खाते एवढे बेफिकीर का वागतय? याच ग्रामस्थांना आश्चर्य वाटतंय.
www.konkantoday.com