रत्नागिरी-जेलरोड येथे बेदरकार दुचाकी चालवणाऱ्या स्वारावर गुन्हा

0
23

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवार 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वा.जेलरोड येथील महाडवाला बिल्डिंग समोर झाला होता. अद्वैत प्रकाश जाधव (वय 21, रा. शिपोशी लांजा, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सौरभ नंदकुमार सावंत (वय 35, रा. कुवारबाव, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार शनिवारी रात्री अद्वैत आपल्या ताब्यातील केटीएम दुचाकी (एमएच-08-एई-0004) वरून भरधाव वेगाने जात होता. तेव्हा रस्त्यावरील मातीवरून दुचाकी घसरल्याने त्याचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्याला आणि हाता-पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारांसाठी त्याला कोल्हापूरला नेण्यात येत असताना अद्वैतचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here