कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पाली ते आंबापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी
साखरपा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील पाली ते आंबा या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या अमित केतकर यांनी लक्ष वेधले होते.
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग मधील पाली ते आंबा हा रस्ता प्रचंड खराब झाला होता. अनेकदा हायवे कार्यालयाशी संपर्क केला. गणपतीपासून खड्डे भरावेत म्हणून मागणी सुरू होती, मात्र दाद लागत नव्हती. ही परिस्थिती लक्षात घेत संगमेश्वर तालुका भाजप सरचिटणीस अमित केतकर यांनी पुढाकार घेतला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे स्वीय सहायक बी.थेंग यांच्याशी थेट संपर्क केला आणि परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर थेंग यांनी तातडीने काम सुुरू करण्याचे आश्वासनदिले.
त्याप्रमाणे अवघ्या दोन दिवसात खड्डे भरणे, पॅच करणे, सिलकोट या कामाला प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर येथील कंपनी सदर रस्त्याचे डागडुजी काम करत आहेत. अमित केतकर यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत साखरपा त्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.