
राज्यस्तरिय ऑनलाईन स्पर्धेत देवरुखातील विलास रहाटे यांच्या रागोंळीला प्रथम क्रमांक
वास्तव क्रियेशन संस्था, कुर्ला मुंबई यांच्यामार्फत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरिय ऑनलाईन स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज व गडकिल्ले या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत देवरुखातील श्री. विलास रहाटे यांच्या रागोंळीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कुर्ला, मुबंई येथे पार पडला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते भूषण कडू यांच्या हस्ते विलास यांचा सत्कार करण्यात आला. या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्व जिल्ह्य़ातील अनेक स्पर्धेक सहभागी झाले होते मात्र देवरुख सारख्या ग्रामीण भागातुन कोणतेही प्रशिक्षण नसताना विलास यांनी अशा अनेक स्पर्धेत यश मिळवले आहे.
www.konkantoday.com