ठाकरे सरकारच्या शिवभोजन थाळीचे होणार स्पेशल ऑडिट
फडणवीस सरकारमार्फत शिवभोजन योजनेचेही सोशल ऑडिट होणार आहे, ज्यामुळे ठाकरे सरकारला आता आणखी एक धक्का बसणार आहे. यशदा आणि टीस या संस्थांमार्फत हे सोशल ऑडिट होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या ऑडिटमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे. यात शिवभोजन योजनेचा किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या योजनेत काही सुधारणा अपेक्षित आहेत का, योजनेत पारदर्शकता आहे का, अशा प्रश्नांची माहिती गोळा केली जाणार आहे. दरम्यान यात दोषी आढळणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. www.konkantoday.com