
एसटी चालकाने ब्रेक लावल्याने ड्रायव्हर केबिनमध्ये पडून महिला जखमी
पन्हाळेकाझी होळेश्वरवाडी दापोली येथील रंजना रविंद्र जाधव ही महिला आपल्या बहिणीकडे दापोली येथे येण्यासाठी एसटी बसमध्ये बसुन येत असता गावराई हद्दीत आली असता बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे फिर्यादी रंजना ही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला. त्यात ती जखमी झाली. याबाबत एसटी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com