
पुणे येथील बेपत्ता तरूणी गणपतीपुळेत सापडली, नातेवाईकांच्या ताब्यात.
हॉस्पिटलमध्ये जाते, असे सांगून घरात परत न गेलेली महिला गणपतीपुळे या ठिकाणी रात्रीच्यादरम्यान पोलिसांना आढळून आली. चौकशी करत पोलिसांनी तिला सुखरूप तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.हरपळे वस्ती तालुका हवेली, जिल्हा पुणे येथून ही महिला राहत्या घरातून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून निघाली होती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची खबर दिली होती. जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश भागवत हे ७ नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना गणपतीपुळे येथे महिला फिरत असताना बघितल्यानंतर तिची विचारपूस केली असता, तिने सुरूवातीला विसंगत उत्तर दिली. मात्र त्यानंतर सर्व हकीगत पोलीस भागवत यांना तिने सांगितली. www.konkantoday.com