राजापूर येथील तरूणी गळफास लावून आत्महत्या
राजापूर येथील समर्थनगर येथे राहणारी दिपाली अशोक इंगळे (२२) या तरूणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. मुळची पांगरी भुदरगड, कोल्हापूर येथील राहणारी दिपाली इंगळे सध्या आईवडिलांबरोबर राजापूर येथे रहात होते. दिपाली ही पहिल्या वर्षाचे ऑनलाईन शिक्षण घेत होती. दि. १३ रोजी तिचे आईवडील मोटरसायकलने बंगालवाडी राजापूर येेथे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेले होते ते परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दरवाजा ढकलून आत गेले असता घराच्या माडीवर दिपाली ही फास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.www.konkantoday.com