अभिजित हेगशेटय़े यांनी हळबे मावशी वरील पुस्तक दिले राहुल गांधी यांना भेट

भारत जोडो यात्रेतील  कन्याकुमारी ते नांदेंड  या १२०० किमी प्रवासात जवळपास २००० विद्यार्थी तरुणांना भेटलो. यांतील प्रत्येकाला विचारले काय व्हायचे आहे? तर त्यांचे उत्तर आयएएस, आयपीएस, मेडीकल, इंजिनिअर, शासन हे फक्त पाच पर्याय जे देशातील सर्वीस सेक्टर मध्ये येतात एकही उत्पादन, निर्माण, प्रॅाडक्शन क्षेत्तात जाऊ इच्छित नाही , ती क्षेत्र क्षुद्र मानली जातात! असा प्रश्न राहूल गांधी राज्यातील जेष्ट साहित्यिक, पत्रकार , कलावंत, सामाजिक क्षेत्रातील डॅा. गणेश देवी यांचे सोबतच्या विशेष मिटींग मध्ये व्यक्त करतात.
         याचाच एक उपाय अथवा पर्याय निष्काम कर्मयोग साधनेतून मावशी हळबे या कोकणच्या मदरतेरेसा यांनी १९५४ पासून निर्माण केलेल्या अभूतपुर्व कार्यांची ओळख देणारे मी लिहीलेले, Mavashi HALBE  हे पुस्तक दोन ओळीची प्रस्तवना व्यक्त करत मी राहूल गांधी यांना दिले. यांतील प्रस्तावना आणि ब्लर हा जेष्ट भाषातज्ञ, पद्मश्री डॅा. गणेश देवी यांची आहे.  ते अत्यंत आनंदाने स्वीकारत मातृमंदिरच्या महाराष्ट्रातील अभूतपुर्व कार्याला शुभेच्छा दिल्या .
राहूल गांधी यांच्या
कन्याकुमारी पासून कश्मिर पर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेचे गारुडच काही विलक्षण भारावून टाकणारं आहे. एकदा तरी या “ नफरत छोडो ! भारत जोडो” मध्ये काही किलोमीटर आपण चाललेच पाहिजे असे अगदी पहिल्या दिवसापासून वाटत होते. राष्ट्र सेवा दलाने या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच महाराष्ट्रातील पुरोगामी विचार आणि परिवर्तनाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे आणि निर्भयपणे मांडणारे क्रियाशिल साहित्यिक, पत्रकार , छायाचित्रकार, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, यांचे शिष्टमंडळ मा. राहूल गांधी यांना कलमनुरी ( हिंगोली) येथील भारत जोडो यात्रा प्रवासात भेटले. डॅा. गणेश देवी यांच्या नेतृत्वाने ही संधी प्राप्त झाली.
        या वेळी मा. राहूल गांधी यांनी आपल्या अत्यंत व्यग्र दिनक्रमात तब्बल पाऊण तास या शिष्टमंडळाला दिला. विशेषतः तरुणांच्या शिक्षण , रोजगार त्यांचे भवितव्य ते करत असलेला विचार या संदर्भात माहिती घेतांनाच देशातील शुद्र आणि अभिजन प्रश्नातीस मधल्या स्पेस समजून घेण्यात त्यांचा चर्चेवर अधिक भर होता. बुध्द , बसवेश्वर ते वारकरी संप्रदाय याची माहिती जाणून घेण्यात त्यांना अधिक रुची होती.  देशातील श्रमिकांचे श्रम आणि त्याला मिळणारी श्रमप्रतिष्ठा , सामाजिक न्याय याचा त्यांचे संपुर्ण यात्रेतील निरिक्षण फार सुक्ष्म असल्याचे त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होते.
         दुपारी ४ वा भारत जोडो यात्रा पारधी मोड ( हिंगोली ) येथून ४ वाजता सुरु होणार होती. यात्रेसोबत चालण्याचा संकल्प आणि तयारीत मातृमंदिर टिम ( युयुत्सू आर्ते, सतीश शिर्के , अनिल अणेराव, राम बेलवलकर, गुरव, विश्वास भोसले आणि मी यात्रेच्या रिंगणा पुढेच जाऊन उभे राहिलो, सोबत माजी खासदार हुसेन दलवाई, मधु मोहिते भेटले. विकास घारपुरे, अंनिस पटवर्धन आणि ५-६ जण ही दापेलीची टिम येऊन उभीच होती.
          काही क्षणातच या रस्त्यावर इतकी प्रचंड गर्दी वाढली की, जवळपास दोन किलोमिटर पेक्षा अधिक रस्ता दुतर्फा माणसांनी भरुन गेला. बाजूच्या माळरानावरुन चालत येणार्या माणसांचे थवे आणि थवे, या गर्दीत मिसळत होते. धनगर समाजाची जवळपास २५-३० हजार लोक पिवळ्या झेंड्यासह, रस्ता आणि तेथील मैदानाचा एक कोपरा व्यापून होती. यांत तरुणांचा सहभाग सर्वाधिक दिसत होता.
          पोलिसांना या मॅाबला काबु  करण्यात दमछाक होत होती. तेवढ्यात चढावाचे वाकण पार करत राहूलजींची गाडी आली. आणि जमावाला तुफानी उधाण आले. राहूलजी त्यांच्या पोलीस आणि दोरीने बंदिस्त रिंगणात दाखल झाले आणि काही क्षणातच सारे रिंगणच झप झप पावले टाकत तुफानी वेगाने निघाले. त्या सोबत सारी पोलीस यंत्रणा आणि हजारो लाखांचा समुदाय चावी दिल्यागत वेगवान झाला. राहूलजी वेगाने एक एक पाऊस टाकत झपा झप चालत आहेत आणि रिंगणाबाहेरील महाजनसागर त्यांना गाठण्यासाठी धावत आहे. पहाता पहाता जमाव वेगाने पुढे निघून गेला अगदी दृष्टीच्या पलिकडे. आमच्या सोबत तो वेग गाठणारी हजारो पावले त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत विचार करत होती. ही उर्जा , ही शक्ती,हा वेगआणि उत्सफुर्तपणे आलेला हा लहानांपासून वृध्दांपर्यंतचा जनसमुदाय कोणत्या अपेक्षेने आला असेल.? या रस्त्यावर उभा असणारा हाच खरा भारत देश हाच खरा हिंदुस्थान ! त्याला समता, बंधुता, आणि प्रेमाच्या शोधात तो या मातीत काही चाचपडत शोधत आहे. राहूल वर तेवढे प्रेम आणि अपेक्षांचे ओझे ठेवून हा धावत आहे.
नफरतीचा काळा ठप्पा पुसत नवा भारत जोडण्यासाठी आपले सारे पाश मागे ठेवत हा पुढे आला आहे. मिठाच्या सत्याग्रहात , नवनिर्माण आंदोलनात असाच सरसावला होता. आज त्याच अपेक्षा पुन्हा जागृत होत आहेत.
         कन्याकुमारीतील प्रारंभीचा चकचकीत चेहरा आज रापला आहे. करारीपणाचे तेज चमकत आहे. करोडो विश्वासाचे संचित घेत तो कश्मिर च्या दिशेने निघाला आहे. यांत जोडण्याची आणि प्रेमाची भाषा आहे. मात्र तो परिवर्तनाचा अंगार बनून तरुणांना आकर्षून घेत आहे. या देशातील परिवर्तनेही लाटांच्या आक्रमणातूनच झाली आहेत. ही वैचारिक परिवर्तनाची लाट येत आहे. यांत नाही बसून राहु शकत मी माझ्या घरी. आपण ही राहू नये.
आपण व्यक्त होत भूमिका समजावून घेत सहभागी होणे महत्वाचे. —-
अभिजित हेगशेटये
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button