
राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला डेरवण येथे प्रारंभ
चिपळूण : राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला एसव्हीजेसीटी डेरवण या ठिकाणी प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन व एसव्हीजेसिटी क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातून साडेतीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रोफेसर डॉ. शत्रुंजय कोटे, वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, प्रफुल्ल गोडबोले, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे सचिव डॉ. मकरंद जोशी आदी याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा नॅशनल डेव्हलपमेंट, एज ग्रुप, ज्युनियर गट या गटांमध्ये घेण्यात येत आहेत. संगिताच्या तालावर खेळाडूंनी केलेल्या लयबद्ध कसरतींमुळे प्रेक्षकांनी स्पर्धा बघण्यास गर्दी केली होती. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एज ग्रुप आणि ज्युनिअर गट यांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यांचे निकाल पुढीलप्रमाणे : ज्युनियर (पुरूष एकेरी) : अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अद्वैत वझे – औरंगाबाद, अनुराग देशमुख – जालना, साईदीप राजेश्वर – हिंगोली. महिला एकेरी : राधा सोनी – औरंगाबाद, वृंदा सुतार – पिंपरी चिंचवड, अस्मिता घुगे – हिंगोली. मिश्र दुहेरी : अनिकेत चौधरी, गौरी ब्राह्मणे – औरंगाबाद, साईदीप राजेश्वर, अस्मिता दिलीपराव – हिंगोली, विश्वेश जोशी, श्रेया लोंढे – जालना. तिहेरी : विश्वेश पाठक, राधा सोनी,अनिकेत चौधरी -औरंगाबाद; पारिजा क्षीरसागर, निधी असाहे, वृंदा सुतार – पिंपरी चिंचवड; श्रेया लोंढे, विश्वेश जोशी,अनुराग देशमुख – जालना. ग्रुप : औरंगाबाद ग्रुप – प्रथम -14.86 , पिंपरी चिंचवड ग्रुप द्वितीय – 12.25, जालना ग्रुप – तृतीय – 11.70 यांनी यश मिळविले. या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.