राजापुरात लवकरच पर्यावरणपूरक मोठा प्रकल्प. युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्ट संकेत.

गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगू शकतो पण ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी अडीच वर्षे स्वतःला बंद करून घेतलं होतं. अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. कोकणात येथील लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प कोकणात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पण पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणात आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि त्याची सुरुवात झाली आहे आणि लवकरच हजारो तरुणांना रोजगार मिळेल. असा मोठा प्रकल्प येथे येईल असेही जाहीर सुतोवाच शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. या राजापूर मध्ये पर्यावरण पूरक असा शंभर टक्के मोठ्या प्रकल्प येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, यांचे बंधू किरणभैय्या सामंत आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

”रोज सकाळी कोणीतरी उठलं की शिव्या दयायच्या कोणतरी रोज उठत आणि सांगतो उद्योगधंदे इकडे गेले तिकडे गेले असे सांगत हा फेक नेरेटीव्ह चालवण्याचं काम विरोधकांकडून केले जात आहे”, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा गेली सव्वा दोन वर्ष पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. याआधी महाराष्ट्रात इतके निर्णय झाले नव्हते महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रकल्प आले डेव्हलपमेंट झाल्या. पण उद्योगधंदे बाहेर जात आहेत हा फेक नेरेटीव विरोधकांकडून चालवला जातो. उदय सामंतही व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या काळात एक लाख 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत.त्यांच्या काळात अडीच वर्षात काही सामंजस्य करार उद्योगांबाबत झाले झाले पण एकही प्रकल्प जागेवरती झाला नाही आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला दाखवा जागेवर घेऊन जा आणि प्रकल्प दाखवा पण काहीच काम झालं नव्हतं असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. त्यांच्या काळात एकही प्रकल्प आला नाही एकाही प्रकल्पाची सुरुवात झाली नाही आम्हाला घेऊन जा आणि दाखवा तुमच्या काळात झालेल्या एम ओ यु केलेल्या पैकी प्रकल्प आले असे थेट आव्हान श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना दिलं एखादं काम दिल्यानंतर ते काम पूर्ण कस होईल यासाठी पाठपुरावा हा नेहमी किरण भैयांचा असतो 23 तारखेला तुम्ही आमदार म्हणून निवडून याल असे शब्द त्यांनी हो काय लांजा राजापूर मतदारसंघाचे किरण सामंत त्यांचे कौतुक केलं. तेच तेच रडगाणं यांना वाटतं आमच्याकडे सिम्पथी आहे अरे नाही तुमच्याकडे सिम्पथी नाही फक्त संपत्ती राहिलेली आहे अशी टीका शिंदे यांनी केली.

कोकणाचे कायम शिवसेना भाजपा युतीला साथ दिली आहे लोकसभा निवडणुकीत कोकण महायुती बरोबर राहिलं या विधानसभेतही येथील जनता महायुती बरोबर राहील जे हिंदुत्वाला विसरून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले त्यांच्याबरोबर येथील जनता उभी राहिली नाही हे लोकसभा निवडणुकीत येथील कोकणातील जनतेने दाखवून दिलं असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी कोकणाचे कौतुक केलं. मुंबईमध्ये त्यांच्या काही जागा निवडून आल्या पण आम्ही सांगितलं काँग्रेसची मांडीवर वोट बँक एक विशिष्ट समाजाची मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्याबरोबर गेले असे शब्दात उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. खुर्चीचा मोह असतो आणि हाच मोह काहीना झोपू देत नाही आणि यामुळेच काहींना हा मोह अडीच वर्षांपूर्वी जे सत्तेत होते त्यांना झाला आणि ते खुर्चीवर जाऊन बसले.आधी महाराष्ट्रात 127 जागा लढत होते आणि आता महाविकास आघाडीत चव्हाण साहेबांकडे पहात त्यांना विचारत चव्हाण यांनी आघाडीतील ठाकरेंच्या जागा वाटपाचा आकडा सांगताच पहा आता ते महाविकास आघाडीत 90 जागांवर येऊन बसले पण ते बोलायला तयार नाहीत ही परिस्थिती त्यांच्यावर आली आहे आणि आता कोण त्यांना विचारत नाहीत असा खरपूस समाचार खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button