
मुक्या जनावरांसाठी चळवळ उभारणारे मुकेश गुंदेचा यांचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
रत्नागिरी : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुकेश गुंदेचा यांच्या समाजातील कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर याच्या हस्ते करण्यात आला.
महासंस्कृती व्हेंचर्सच्यावतीने ‘कोकण सन्मान 2022’ कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणार्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. मुकेश गुंदेचा यांनी 2011 पासून मुक्या जनावरांची बचाव चळवळ सुरू केली. यासाठी त्यांनी नरबे येथे गोशाळा उभारली. आतापर्यंत अपघातामध्ये जखमी 200 पेक्षा अधिक जनावरांवर उपचार करून जीवदान दिले आहे. मोकाट गुरांसाठी गोशाळा उभारून त्यांच्यावर उपचार केले.
रत्नागिरी येथे कुष्ठ रुग्णांना राहण्यासाठी वसाहतीचे काम 2019 साली सुरु करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. कोरोना काळात त्यांनी मोठी मदत यंत्रणा उभी केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत सत्कार करण्यात आला. महासंस्कृती व्हेंचर्सच्या संस्थापक संचालक शिल्पा परांडेकर, संचालक ऋतुराज हेसी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.