
रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही
जिल्हा शासकीय रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ दहा ते बारा दिवस झाले रजेवर गेल्याने प्रसूती विभागात एकही डॉक्टर नाही. खासगी डॉक्टर येतात. मात्र ते २४ तास बांधिल नाहीत. जर एखाद्या गरोदर महिलेची तब्येत अधिक बिघडली की कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये हलविण्याची वेळ रूग्णालयावर आली आहे. खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे,, असे आवाहन करूनही जिल्हा रूग्णालयात फारसा प्रतिसाद मिळत नाही.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी दाखल होणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. महिन्याला तब्बल २५० हून अधिक प्रसुत्या होतात. अगदी रत्नागिरी शहर ते मंडणगड तालुक्याच्या सर्व गरोदर मातांना या ठिकाणी चांगली सेवा मिळते म्हणून दाखल होत असतात. मुळात गेली अनेक वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आहे. अशा परिस्थितीतही सिव्हिल हॉस्पिटल रूग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. डेरवण वालावलकर हॉस्पिटलने सध्या मदतीचा हात दिला असून काही पीजीचे डॉक्टर या ठिकाणी येवून सेवा देतात. मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याने सध्या प्रसूती विभागात कामाचा भार वाढला आहे. www.konkantoday.com