महामार्गावरील भोस्ते घाटात पुन्हा मासळीच्या कंटेनरला अपघात, चालक सुदैवाने बचावला

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळ्णावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही, चार दिवसांपूर्वी एल पी जी गॅस वाहून नेणाऱ्या टँकर पलटी होऊन हाहाकार माजल्याची घटना ताजी असतानाच आज त्याच वळणावर ओली मासळी वाहून नेणाऱ्या कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक या जीवघेण्या अपघातातून बचावला. भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर आणखी किती अपघात झाले, किती जणांचा बळी गेला आणि कितीजण जायबंदी झाले कि महामार्ग विभागाला जाग येणार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाचे दोन वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. हे काम करताना महामार्गावरील त्या अवघड वळणाचे काम योग्य प्रकारे न झाल्याने चौपदकरीकरणचे काम झाल्यापासून या अवघड वाळणवर एकामागोमाग एक असे अपघात होत असल्याची चर्चा आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात या वळणावर १०० हुन अधिक अपघात झाले आहेत. तीव्र उताराचा भोस्ते घाट उतरणाऱ्या वाहन चालकांना या अवघड वळणाचा अंदाज येत नसल्याने इथे वाहनावरील ताबा सुटतो आणि ते वाहन संरक्षक भिंतीला धडक देऊन पलटी होते. गेल्या महिनाभरात एकाच ठिकाणी सुमारे सहा ते सात अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झालेली आहे.
चार दिवसांपूर्वी याच वळणावर जयगड येथून मुंबईकडे एल पी जी गॅस घेऊन निघालेल्या टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून एल पी जी गॅस ला गळती लागल्याने भोस्ते घाटात हाहाकार माजला. पोलिसांनी तात्काळ दोन्ही बाजूची वाहतुक बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. सुमारे ४ तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला होत्या, पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वाळविल्याने खोळंबले प्रवाशी मार्गस्थ होऊ शकले होते. वळणावर पलटी झालेल्या एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकर तब्बल ४८ तासानंतर अपघातस्थळावरून हटविण्यात आला होता.
ही घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून मुंबईकडे ओली मासळी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने हा महाकाय कंटेनर त्या अवघड वाळणवरील संरक्षक भिंतीला आदळून पलटी झाला. या अपघातात चालकांच्या केबिनच्या पूर्णतः चक्कचुर झाला मात्र तरीही चालक या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत बचावला.
भोस्ते घाटात त्या अवघड वळणावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेत महामार्ग बांधकाम विभागाने या ठिकाणी कायस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र बांधकाम विभागाकडून तशी कोणतीही खबरदारी घेत जात नसल्याने आणखी किती अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button