
रिपब्लिकन (आठवले) पक्षाची शनिवारी दापोलीत जाहीर सभा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची दापोली तालुक्याची जाहीर सभा शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी ११.३० वाजता दापोली तालुक्यातील भाटकर हॉस्पिटलच्या पुढे हॉटेल अभिषेक येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, दापोली तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ. रेश्मा नेवरेकर, उपाध्यक्ष सौ.रेश्मा जाधव, सरचिटणीस सौ. दीक्षा रुके, युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र जाधव, सरचिटणीस अंकित कदम आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या जाहीर सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा ३ ऑक्टोबर रोजी क्रांती भूमी महाड येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला – पुरुष कार्यकर्त्यांचे, सभासदांचे आणि गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकींच्या तयारीबाबत आढावा घेऊन ठाम निर्धार करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दापोली तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत क्रियाशील सदस्यांना पदनियुक्तीचे पत्र आणि ओळखपत्र (आयकार्ड) वितरीत करण्यात येणार आहे.
या सभेला दापोली तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या बेसिक कार्यकारणी महिला आघाडी व युवक कार्यकर्त्यांनी वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे दापोली तालुकाध्यक्ष राहुल जाधव, सरचिटणीस दिनेश रुके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




