
फंडाच्या फसवणूक प्रकरणी मंडणगड न.पं.च्या स्वीकृत नगरसेवकासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील गंतवणुकदारांच्या फसवणुकीच्या प्रकरणी एका कंपनी विरोधात यश दीपक घोसाळकर यांनी मंडणगड पोलीस ठाणे येथे 18 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मंडणगड पोलीसांनी या प्रकरणात पोलीस तपास सुरु केला. वेगवेगळ्या लोकांचे जाबजवाब नोंदविण्यात आले. पोलीसांनी 4 नोव्हेंबर 2022 रोजी मंडणगड नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक हरेष मर्चंडे (राहणार – मंडणगड) याच्यासह परेश वणे, निलेश रक्ते (राहणार पाले) अशा तिघांना अटक केली आहे. 18 ऑक्टोबर 2022 रोजी आठ जणांच्या विरोधात साठ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आमचीही याच कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी अनेकजण पुढे येते आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शनिवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संबंधितांना पुढील कार्यवाहीकरिता खेड येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.