आमदार भास्कर जाधव यांना अंतरिम अटकपूर्व जामीन
सिंधुदुर्ग : शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ दि. 18 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात भाषण केले. भाजप तालुकाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीनुसार आ. जाधव यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आ. जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिनावर सोमवारी सुनावणी झाली.