
दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याची गळफासाने आत्महत्या; कोळीसरे कोठारवाडी येथील प्रकार
रत्नागिरी : सुमारे दोन महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या कोळीसरे कोठारवाडी येथील दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यात घडला आहे. रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घरातील वाश्याला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. संदीप जयवंत गोताड ( वय 27) व त्याची पत्नी पूजा संदीप गोताड अशी त्यांची नावे आहेत. खंडाळा पोलिसांनी संदीप व त्याची पत्नी पूजा यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.