एमसीएचे उपाध्यक्ष आमदार किरण सामंत यांनी लंडनमधील क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्या अविराज गावडे याला शुभेच्छा!

लंडनमध्ये होणार्‍या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी आवर्जुन खास शुभेच्छा दिल्या. अविराज हा ५ मे रोजी लंडन येथे होणार्‍या कौंटी व प्रिमियर क्रिकेट लीगसाठी रवाना होत असून त्याने आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी सामंत यांनी त्याला शुभेच्छा देवून त्याचे कौतुक केले. यावेळी रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे बिपीन बंदरकर, अविराज याचे वडील अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.१० मे ते ६ सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या दौर्‍यात अविराज हा इंग्लंडच्या मिडलसेक्स संघाकडून खेळणार असून तो एकूण १६ कौंटी मॅचेस व १४ प्रिमियर लीग मॅचेस खेळणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button